खाण व खनिजे(विकासन व विनियमन) अधिनियम 1957 च्या कलम 9 (ब) उपकलम 1 च्या तरतूदीनुसार राज्य शासनाद्वारे प्रत्येक जिल्ह्याकरिता खनिज बाधीत क्षेत्राचा विकास करण्याकरिता खनिज विकास प्रतिष्ठान स्थापन करण्याचे अधिसूचित करेल अशी तरतूद आहे. केंद्र शासनाने प्रस्तुत विषयी जानिवपूर्वक निर्णय घेऊन देशातील सर्व राज्यामधील खनिज विकास प्रतिष्ठानमार्फत बाधीत क्षेत्राचा विकास करणे साठी एकवाक्यता रहावी व अशा कार्यक्रमामध्ये सामाजिक विकास व मूलभूत गरजा तथील लोकसंख्या व बाधीत क्षेत्राच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीमधून राबविण्याबाबत मार्गदर्गक सूचना संदर्भाधीन दि.16.9.2015 च्या पत्रान्व्ये सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत. तसेच प्रस्तुत सूचना खाण व(विकासन व विनियमन) अधिनियम 1957 च्या कलम २० (अ) च्या तरतूदनुसार राष्ट्रीयहीत लक्षात घेऊन केंद्र शासनाने राज्य शासनास प्रस्तुत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना राबविणे व त्यानुषंगाने मार्गदर्गक सूचना जिल्हा,खनिज प्रतिष्ठानच्या नियमावलीमध्ये अंतभूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
More Details
CONTACT DISTRICT DMO OFFICERS IN DISTRICT OFFICES